top of page

BG 18.77

तच्च‍ संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरे: ।
विस्मयो मे महान्‍राजन्हृष्यामि च पुन: पुन: ॥ ७७ ॥

तत्-ते; च-सुद्धा; संस्मृत्य-स्मरण करून; संस्मृत्य-स्मरण करून; रूपम्-रूप; अति-अत्यंत; अद्भुतम्-अद्भुत; हरेः-भगवान श्रीकृष्णांचे; विस्मयः--विस्मय; मे-मला; महान्-मोठा, महान; राजन्-हे राजन; हुष्यामि-मी हर्षित होत आहे;च-सुद्धा; पुनः पुन:-पुनः पुन्हा.

हे राजन्! भगवान श्रीकृष्णांचे अद्भुत रूप स्मरण केल्याने मी अधिकाधिक विस्मयकारी होत आहे आणि मला पुनः पुन्हा हर्ष होत आहे.

तात्पर्य: असे दिसून येते की, व्यासदेवांच्या कृपेने संजयालाही श्रीकृष्णांनी अर्जुनाला प्रकट केलेले विश्वरूप पाहता आले. अर्थात असे म्हटले जाते की, भगवान श्रीकृष्णांनी पूर्वी कधीच असे रूप प्रकट केले नव्हते. हे रूप केवळ अर्जुनालाच प्रकट करण्यात आले होते. तरीही अर्जुनाला जेव्हा हे रूप दाखविण्यात येत होते तेव्हा काही महान भक्तही श्रीकृष्णांचे विश्वरूप पाहू शकले आणि त्या महान भक्तांपैकी व्यासदेव हे एक आहेत. ते एक महान भगवद्भक्त आहेत आणि श्रीकृष्णांचे एक शक्तिशाली अवतार आहेत. व्यासदेवांनी हे आपला शिष्य संजय याला प्रकट केले. संजयाने श्रीकृष्णांच्या त्या अद्भुत रूपाचे स्मरण केले व त्यामुळे तो वारंवार हर्षित होत होता.

bottom of page